गुडघेदुखीवर रामबाण उपाय ठरतील ही योगासने

गुडघेदुखी ही अशी समस्या आहे की ती एकदा सुरू झाली की आपल्या हालचालींवर बंधने यायला लागतात म्हणूनच गुडघेदुखी सुरू होऊ नये म्हणून किंवा झाली असल्यास आटोक्यात राहण्यासाठी काही सोपी योगासने केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

चौड्यांवर चालावे, पायाच्या मागच्या स्नायूंचा व्यायाम होण्यासाठी असे चालणे अतिशय फायदेशीर ठरते. किमान २ फेऱ्या मारल्या तरी गुडघ्याच्या स्नायुंना व्यायाम मिळण्यास मदत होते. 

टाचांवर २ फेऱ्या माराव्यात. सुरुवातीला बॅलन्स करणे अवघड जाईल, पण नंतर हळूहळू जमायला लागेल. एरवी आपण असे चालत नाही. पण गुडघ्याच्या स्नायुंना आराम मिळण्यासाठी मात्र हा व्यायाम अतिशय गरजेचा ठरतो. पाय गुडघ्यातून वाकवून त्याचा काटकोन करायचा.

गुडघ्याच्या खालील मांडीचा भाग दोन्ही हाताने धरायचा. आणि मग पाय गुडघ्यातून एकदा काटकोनात आणायचा आणि एकदा सरळ करायचा. असे किमान २० वेळा केल्यास वाटीतील वंगण सुरळीत होण्यास मदत होते. 

🤙 8080365706