
बालिंगा/मोहन कांबळे : पिरवाडी तालुका करवीर येथील एका वळणावर शनिवारी पहाटे गोव्याहून कोल्हापूर कडे येणारा ट्रक पलटी झाला होता. सदर टॣकामध्ये शितपेयांचेबॉक्स होते. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी ट्रक ड्रायव्हर व क्लिनर यांच्याकडे लक्ष न देता शीतपेयांचे बॉक्स लंपास करून कोल्हापूरच्या परंपरेला काळीमा फासणारी घटना झाल्याची बातमी न्युज मराठी २४ वर चित्रफितीसह सकाळी प्रसिद्ध करण्यात आली होती.
याचीच दखल घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी करवीर पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत की सदर घटनेची चौकशी करून शीत पेयाचे बॉक्स पळणारे लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. यासंदर्भात नुकतेच करवीर पोलीस स्टेशनला कारवाई बाबत आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे शितपेयांचे बॉक्स लंपास करणार लोकांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे. न्यूज मराठी २४ बातमीचा हा इफेक्ट असल्याचे नागरीकात बोलले जात आहे.
