राजे विक्रमसिंह घाटगे बँकेस देश पातळीवरील पुरस्कार जाहीर -अध्यक्ष एम्. पी. पाटील

कागल : कागलच्या राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेस देश पातळीवर दिला जाणारा “बँको” पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील यांनी दिली.

पाटील पूढे म्हणाले, कागल जहागीरीचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जन्मदिनी ही बँक स्थापन झाली आहे. स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशिर्वादाने व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजे बँक सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचे प्रतिक बनली आहे. शतक महोत्सवी “राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेस सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामकाजाबद्दल देश पातळीवर दिला जाणारा बँको ब्ल्यु रिबन २०२२ पुरस्कार जाहीर झाला असून बँकेच्या व्यवसायाची सन २०२२–२३ मध्ये रू. ७५० कोटीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे.

बँकेच्या जानेवारी २०२३ अखेर एकूण ठेवी ४५० कोटी झाल्या आहेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी चिकाटीने वसुली केलेने बँकेने निव्वळ एन. पी. ए. शुन्य टक्के राखन्यात सातत्य ठेवले आहे. सदरचा पुरस्कार बँकेचे संचालक मंडळ सदस्य, सर्व सभासद, सर्व ग्राहक व कर्मचारी यांचेमुळे प्राप्त झालेचे सांगीतले. सदर पुरस्कार २७ फेब्रुवारी २०२३ मध्ये महाबळेश्वर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. बँकेस यापुर्वी २० पुरस्कार मिळाले असून हा २१ वा पुरस्कार आहे. बँको पुरस्कार नागरी सहकारी बँकांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे. या हेतुने बँको समिती मार्फत दिला जातो.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, बँकेचे संचालक सर्वश्री राजेंद्र जाधव, आप्पासो हुच्चे, आप्पासाहेब भोसले, प्रकाश पाटील, रविंद्र घोरपडे, रणजित पाटील, उमेश सावंत, संचालिका सौ. कल्पना घाटगे, तज्ञ संचालक अनिल मोरे ॲड. बाबासाहेब मगदूम व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण, व्यवस्थापक प्रशासन हरीदास भोसले व अधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706