
मुंबई : आज जागतिक कर्करोग दिन असून कर्करोग हा भारतातील सार्वजनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा प्रश्न मानला जातो.

हा आजार केवळ माणासाला शारीरिक आणि मानसिकरित्याच कमकुवत करत नाही तर माणसाची आर्थिक स्थिती पूर्णपणे हालवून टाकणारा हा आजार आहे.अगदी मध्यमवर्गीय लोकांनासुद्धा कँसरचा खर्च न झेपणारा आहे. अनेकांना तर कॅन्सरच्या उपचारासाठी भारतात कोणकोणत्या योजना आहेत याबाबतसुद्धा माहिती नाही. तेव्हा त्यांच्यासाठी या योजना जाणून घेणे जास्त महत्वाचे ठरते. जेणेकरून तुमचा खर्च वाचेल.भारतात ७५% पेक्षा जास्त कॅन्सर आजारावरचे खर्च खिशातून दिले जातात.म्हणूनच, भारतातील वाजवी कर्करोगाच्या काळजीसाठी वैयक्तिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आरोग्य खर्चातील महत्त्वपूर्ण फरक आणि मूलभूत आरोग्य निर्देशक आणि परिणामांमधील तफावत यांची योग्य समज असणे आवश्यक आहे. सामान्य आरोग्य विमा आणि अगदी सर्वसमावेशक योजना देखील व्यक्तींना कर्करोगासाठी पूर्ण उपचार लाभ देऊ शकत नाहीत. म्हणूनच, त्यासाठी हेल्थ इन्शूरन्स घेणे घेणे आवश्यक आहे.
