
आरोग्य टिप्स : तुमचा दात दुखीचा त्रास वाढत गेला तर, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक. पण जर आपल्याला घरगुतीरित्या दातांच्या दुखण्यापासून आराम हवा असल्यास काही टिप्स फॉलो करा. याने नक्कीच आपल्याला आराम मिळेल.

हलकीशी दातदुखी होत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे हा उत्तम उपाय ठरेल. मीठ हे डिसइनफेक्टन्ट असल्यामुळे दातांमधील किडे मारण्यास मदतगार आहे. हा घरगुती नुस्खा दिवसातून २ ते ३ वेळा रिपीट करा.
बेकिंग सोडा पेस्ट दातांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिसळा. व त्या टूथपेस्टने ब्रश करून घ्या. असं केल्याने दात – दाढीतील दुखणं कमी होईल. ही प्रक्रिया दिवसातून २ वेळा करा.
शरीरातील प्रत्येक सूज कमी करण्यासाठी बर्फ मदत करते. जर आपल्या दाढेवर अथवा दातांवर सूज निर्माण झाली असेल, तर त्या भागावर आईसपॅकने शेक द्या. आपण ही प्रक्रिया दिवसातून २ ते ३ वेळा करू शकता. याने सूज कमी होईल, यासह आराम मिळेल.
लसणाच्या कळ्या चावा जखम बरी करण्यासाठी लसूण वापरण्यात येते. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. दातांचे दुखणे कमी करण्यासाठी आपण लसणाचा वापर करू शकता. लसणाची पेस्ट तयार करून दातांवर लावा, अथवा कच्च्या लसणाच्या कळ्या चावून रस दुखणाऱ्या दातांवर ठेवा. असं केल्याने दातांना आराम मिळेल.
