
सासवड -सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (150 वर्षे) झाल्याबद्दल सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये रविवारी (दि.5) सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये सत्यशोधक समाज परिषदचे महात्मा फुले प्रतिष्ठान व स्व. सदाशिव आण्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष माजी सनदी अधिकारी व ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांनी दिली.

सत्यशोधक समाज परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे या आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पुरंदरचे आमदार संजय जगताप उपस्थित राहणार आहेत. यावेळी कै. एकनाथराव जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रा. जितेंद्र देवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
