कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांना मारहाण

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या चौकात कोल्हापूर कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांना शिवाजी पेठे परिसरातील कार्यकर्त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केलीय. हा सर्व प्रकार महापालिकेच्या आवारात घडलाय.

मोरे आज महापालिकेत शिष्टमंडळासोबत शिवाजी विद्यापीठ आणि महानगरपालिकेची माहिती घेण्यासाठी आले होते. यावेळी शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्ते आणि रमेश मोरे यांच्यात फुटबॉल संघ खेळाडू निवडीवरून वादावादी झाली.

यावेळी हा सर्व मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर मंगळवार पेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मारहाणीनंतर मंगळवार पेठेतील चार फुटबॉल टिम समर्थक मोठया संख्येनं मिरजकर तिकटी येथे जमून प्रति हल्ल्यासाठी शिवाजी पेठेकडे निघाले होते यावेळी वरिष्ठ मंडळींनी मध्यस्थी करत समजूत काढून वाद मिटवला. परंतु भविष्यात शिवाजी पेठ विरुद्ध मंगळवार पेठ असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

🤙 8080365706