
मुंबई : माहागाईनं त्रस्त लोकांची चिंता वाढवणारी बातमी असून सोन्याच्या दरांत उच्चांकी वाढ पाहायला मिळत आहे.

सोन्याचे दर 56 हजारांवरुन थेट 57 हजारांच्या आसपास पोहोचले आहे. दरम्यान, सोन्याच्या दरांनी 28 महिन्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. नवीन वर्षाची सुरुवात माहागाईनंच झाली आहे. एकीकडे मंदीचे सावट आहे, तर दुसरीकडे सोनं दिवसेंदिवस वधारत आहे. लग्नसराईमुळे सोन्याची मागणी देखील दिवसें-दिवस वाढत चालली आहे. कोरोनाकाळात सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार रुपयांवर पोहोचले होतं. मात्र इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळता 56 हजार 883 रुपये प्रतितोळा एवढा झाला आहे. अशा प्रकारे सोन्याच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे.
