शिंदे गटातून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बातमी समोर…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होऊन आता सात महिने होत आले आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. पण अजूनही २२ जागा रिकाम्या आहेत. शिंदे गटातून अनेकांना मंत्रिपदाचे वेध लागले असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.

जानेवारी महिन्याच्या शेवटी व फेब्रवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. मंत्रिमंडळाचा विस्तार जानेवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. या विस्तारातही रिक्त असलेल्या सर्व २२ जागा भरल्या जाणार नाही. केवळ १० जागा भरल्या जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजीनाट्य होऊ नये म्हणून फक्त १० जागा भरल्या जाणार आहेत. आताच्या विस्तारात ८ जणांना राज्यमंत्री केले जाणार आहे. त्यात दोन जणांना कॅबिनेट मंत्री केले जाणार आहे.

🤙 8080365706