
मुंबई : शिंदे गटातील महत्त्वाचे नेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा प्रकरणी खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीम इंडियाचा अंडर 19चा माजी कर्णधार विजय झोलवर गुन्हा दाखल झालाय. विजय झोल हा खोतकर यांचा जावई आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आला आहे. घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. यामुळे खोतकर यांचे जावई अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी विजय झोल यांच्यावर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहेत आरोप? क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली, ज्यात या क्रिप्टो करन्सीचा मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरून क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केलाय.
