महिला आयपीएलसाठी बीसीसीआयची जोरदार तयारी…

मुंबई: यंदापासून सुरू होणाऱ्या महिला आयपीएलसाठी बीसीसीआयने जोरदार तयारी सुरू केली आहे. सोमवारी लीगच्या मीडिया हक्कांवरही निर्णय घेण्यात आला.

Viacom 18 ने सर्वात मोठी बोली लावून या लीगचे मीडिया हक्क मिळवले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. Viacom 18 ने 951 कोटी रुपयांची बोली लावून 2023 ते 2027 साठी हक्क विकत घेतले. याचा अर्थ वायकॉम 18 प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 7.09 कोटी रुपये देईल.याबाबत अधिक माहिती अशी की, बीसीसीआयने २०२२ मध्ये महिला आयपीएल २०२३ पासून सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मीडिया हक्काचा निर्णय झाल्यानंतर 25 जानेवारीला महिला आयपीएलच्या पाच संघांचीही घोषणा केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला आयपीएल फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आयोजित केले जाऊ शकते.

🤙 8080365706