शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांचे जातीयवादी विधान मान्य असल्याचं सांगावं; किरीट सोमय्या

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत पुन्ह एकदा हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. मी मुस्लिम असल्यानं हे छापे मारले जात आहेत, जाणीवपूर्वक छापे मारले जात आहेत असा आरोप ईडीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ यांनी केला होता. आता यावरून किरीट सोमय्या यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधाला आहे. शरद पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांचे जातीयवादी विधान मान्य असल्याचं सांगावं असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सोमय्या यांनी नेमकं काय म्हटलं? किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मी मुस्लिम असल्यानं हे छापे मारले जात आहेत, जाणीवपूर्वक छापे मारले जात आहेत, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. मुश्रीफ यांच्या या वक्तव्यावरून सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला.भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का?, मला कोल्हापूरमध्ये प्रवेश करू दिला नाही, तेव्हा धर्म आठवला नाही का? असे सवाल करत सोमय्या यांनी मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. तसंच शरद पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांचे जातीयवादी विधान मान्य असल्याचं सांगावं असंही सोमय्या यांनी यावेळी म्हटलं आहे.

🤙 8080365706