
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली या निवडणुकीत श्री महालक्ष्मी सहकार सत्तारूढ पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवला.

अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलंय होतं. सभासदांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषद सोसायटीच्या चाव्या सत्ताधाऱ्यांकडेच दिल्या. या निवडणुकीमध्ये श्री महालक्ष्मी सहकारी सत्तारूढ पॅनलचे विजयी उमेदवार असे आहेत अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, रवींद्र जरळी, अजय शिंदे, महावीर सोळांकुरे, श्रीकांत चव्हाण, सुनील पाटील, बाजीराव पाटील, सचिन गुरव, सरदार दिंडे, नंदीप मोरे, रणजीत पाटील, साताप्पा मगदूम, विजयकुमार रेळेकर, सुधाकर कांबळे, उत्तम वावरे, मुजमिल नावळेकर, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव हे सर्व उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत.
