जी 20 परिषदेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन…

पूणे : जी 20 परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे.

आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे.या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील. IWG सदस्य राष्ट्रे, अतिथी राष्ट्रे आणि भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे ६५ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. यादरम्यान ते भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली २०२३ च्या पायाभूत सुविधांच्या अजेंडावर चर्चा करतील.नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. नारायण राणे म्हणाले, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो की ही जी 20 ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे उद्घाटन माझ्या हाताने झाले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धनयवाद देतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. जगातील शहरातील विकास कसा होईल याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत.”

🤙 8080365706