
आरोग्य टिप्स: सगळ्या शरीराचं आरोग्य जपणं जसं गरजेचं आहे, तशीच काळजी तळपायांचीही घेणं आवश्यक आहे. म्हणूनच तर तळपायांना नियमितपणे का मालिश केली पाहिजे, त्याने नेमके कोणते फायदे होतात, याविषयी ही खास माहिती.

आपल्या तळपायावर डोळ्यांच्या आरोग्याशी निगडीत ४ पॉईंट्स असतात. त्यामुळे तळपायांना नियमितपणे मालिश केल्यास नजर वाढण्यास मदत होते. डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात.
ज्यांची वात प्रकृती असते, त्यांनी नियमितपणे तळपायांना मालिश करावी. शरीरातील वात कमी होण्यास मदत होते.
एखाद्या गोष्टीचा खूप ताण आला असेल, खूप थकल्यासारखे वाटत असेल तर तळपायांना केलेली मालिश फायदेशीर ठरते. ताण कमी होतो तसेच थकवा दूर होण्यास मदत होते.
ज्यांना रात्री बराच वेळ झोप लागत नाही किंवा शांत झोप होत नाही, त्यांनीही तळपायांना मालिश करावी आणि नंतर झोपावे. शांत झोप मिळेल.
तळपायांना मालिश करण्यासाठी तिळाचे तेल किंवा ब्राह्मी तेल वापरणे अधिक फायदेशीर ठरते.
