कोल्हापुरात डॉग शो चा दिमाखात प्रारंभ

कोल्हापूर – केनेल असोसिएशन कोल्हापूरतर्फे आयोजित UKC dog show ला रंकाळा तलावा जवळील खराडे कॉलेजच्या मैदानावर प्रारंभ झाला.

राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित खराडे यांच्या हस्ते शोचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात रॉटविलर आणि लॅब्रॉडॉर स्पेशल घेण्यात आला आग्र्याचे जज कोमल सिंग राजपूत यांनी परीक्षण केले. यावेळी तब्बल 80 श्वानांनी सहभाग घेतला होता.

Ring steward म्हणून पंजाब मधील सतपाल यांनी काम पाहिले उद्या सकाळी आठ वाजल्यापासून ऑल ब्रीड शोला सुरुवात होणार असून विविध जातींचे 200 हून अधिक श्वान कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत. यावेळी अध्यक्ष सागर पाटील उपाध्यक्ष सौरभ तेंडुलकर सेक्रेटरी अजित हरणे आणि खजानिस मकरंद पाटगावकर यांच्यासह श्वानप्रेमी उपस्थित होते.

🤙 8080365706