चेहरा छान दिसतो. मात्र, मान काळी पडलीयं?; हा घ्या घरगुती उपाय…

ब्युटी टिप्स : चेहरा छान दिसतो. मात्र, मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते. यावर संत्र्याच्या सालीपासून पावडर उपयुक्त ठरेल. हा घरगुती उपाय नक्की करून पाहा.

साहित्य

संत्र्याच्या सालीपासून तयार पावडर

दूध

लिंबू

कृती

सर्वप्रथम, एका संत्र्याच्या सालींना उन्हात सुकवून घ्या. सुकवल्यानंतर त्याची पावडर तयार करून घ्या. ही पावडर एका बाऊलमध्ये घ्या, त्यात २ चमचे दूध टाका, आणि मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर लिंबूच्या साहाय्याने काळपट पडलेल्या जागेवर लावा, आणि सोम्य हाताने घासा. मिश्रण लावल्यानंतर २० मिनिटे तसेच ठेवा. शेवटी पाण्याने धुवून घ्या. उत्तम रिझल्टसाठी ही पेस्ट आठवड्यातून २ ते ३ वेळा लावा.हा पॅक लावल्याने त्वचेवर नवी चमक मिळते. यासह त्वचा ग्लो आणि तुकतुकीत होते.त्वचेला टोन करण्यासाठी हा पॅक मदतगार ठरेल.

ही माहिती स्वतः च्या जोखमिवर वापरावी.

🤙 8080365706