नागदेववाडी कॉलनी अंतर्गत नळपाणी योजनेचा शुभारंभ

बालिंगा : नागदेववाडी ग्रामपंचायत अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या कॉलनी वासीयांची पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीचे वतीने जल जिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा सुधारणा करणेसाठी रुपये एक कोटी ७६ लाख मंजूर झाले आहेत. या कामी माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे सहकार्य लाभले.

या कामाचा शुभारंभ लक्ष्मी कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, शिंदे कॉलनी व व ईतर लहान कॉलनी करीता ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब दिवसे, भागातील ग्रामपंचायत सदस्य रवी पोतदार, राजेंद्र दिवसे, सुभाष पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाची प्रत्यक्ष सुरवात करणेत आली.

यावेळी भागातील नागरिक डॉ.खाडे, जि.प.सोसायटीचे अध्यक्ष खोपडे, किशोर डांगी, बाजीराव जाधव, विलासराव गायकवाड , सरपंच, उपसरपंच सदस्य व भागातील रहिवाशी उपस्थित होते.

🤙 8080365706