‘काँग्रेस’ सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही; नाना पटोले

मुंबई : सुधीर तांबे यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.

झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेईल. मात्र, काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.भाजपकडून दुसऱ्याची घरं फोडण्याचं कामकाँग्रेस पक्षाच्या वतीनं सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाला फसवलं असल्याचे नाना पटोले म्हणाले. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे पटोले म्हणाले. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवरही टीका केली. भाजप भय दाखवून घरं फोडण्याचं काम करत असल्याची टीका पटोले यांनी केली. भाजप आज दुसऱ्याची घरं फोडून आनंद घेत आहे. पण ज्यादिवशी भाजपचे घर फुटेल त्यादिवशी त्यांना घरं फोडण्याचे दु:ख काय असते ते कळेल असे पटोले म्हणाले.

🤙 8080365706