
हेल्थ टिप्स : थंडीपासून बचावासाठी बहुतेक लोक रात्री स्वेटर किंवा जर्सी घालून झोपतात. परंतु असे केल्याने आपण गंभीर आजारी आणि अनेक समस्यांना बळी पडू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी आपण रात्री स्वेटर घालून का झोपू नये हे आधी जाणून घेऊया.

रात्री स्वेटर घालून का झोपू नयेस्वेटरचे तंतू कमकुवत होतातरात्री स्वेटर घालून झोपल्याने त्यांचे तंतू कमकुवत होतात, त्यामुळे ते दिवसा शरीराला पुरेशी उबदार ठेवू शकत नाहीत. त्यामुळे रात्री स्वेटर काढून जाड ब्लँकेट किंवा रजाई घालून झोपलेले बरे. तरीही तुम्हाला उबदार कपडे घालून झोपायचे असेल, तर प्रथम तुमच्या त्वचेच्या संवेदनशील भागांवर मॉइश्चरायझर क्रीम लावा. यानंतर हलके स्वेटर किंवा उबदार कपडे घाला.शरीराचा रक्तदाब वाढतोवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, रात्री स्वेटर किंवा इतर उबदार कपडे घालून झोपल्याने रक्तदाब अनेक पटींनी वाढतो. जे आपल्याला झोपताना कळत नाही. या अवस्थेत जास्त वेळ राहिल्यास श्वासोच्छवासाचा त्रास आणि घाम येण्याची समस्या सुरू होते. तुम्हाला असा त्रास होऊ नये, म्हणून तुम्ही रात्री सामान्य कपडे घालून झोपण्याचा प्रयत्न करा.
