कोल्हापूर : अनेक क्षेत्रात प्रतिभावंत बालकलाकार तयार झाले आहेत. पण चिकोडीतील जत्राट या गावी अभंग व गवळण अतिशय सुरेख व तालासुरात म्हणणारी गौरी दादासो चव्हाण(व. व १२वर्षे) रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

अवघ्या बारा वर्षाच्या वयात तिचे अभंग व गवळण ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात.कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील गौरी चव्हाण ही अभंग व गवळन हि वयाच्या आठव्या वर्षापासून म्हणते.केवळ सरावने तिने अभंग व गवळण या कलाप्रकारात आपले वर्चस्व निर्माण केले आहे.तिला यासाठी तिचे वडिल दादासो चव्हाण व आजोबा आप्पासो चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.तिचे अभंग व गवळण हे अनेक खेड्यापाड्यातून ऐकले जातात.अनेकदा लोक तिच्या अभंगाचे व गवळण बतावणीचे कौतुक करतात. चिकोडीतील अनेक गावात तिचे कार्यक्रम होतात. वयाच्या आठव्या वर्षापासून ती गात असलेल्या अभंगाचे व गवळणीचे पंचक्रोशीत कौतुक होते.