
कोल्हापूर: कोल्हापूर शहर आणि जिल्हा परिसरात गव्यांची दहशत कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या 15 दिवसांपासून गव्यांचा कळप कोल्हापूरच्या वेशीवर विविध ठिकाणी दिसून येत असल्याने चांगलीच दहशत पसरली आहे. आता या यादीमध्ये सादळे मादळे डोंगराची भर पडली आहे. आज सादळेच्या सिद्धेश्वर डोंगरात दोन गवे काही ग्रामस्थांना दिसून आले.ज्वारी, गवत कापणीच्या हंगामातच परिसरात गव्यांचा वावर असल्याने भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून गव्यांचे ठसे कासारवाडी शिवारात दिसून आले होते. सिद्धेश्वर डोंगरावर साफसफाई सुरु असताना दोन गवे मनपाडळेच्या दिशेने जाताना दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी गवत कापण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सतर्क केले. विशेष म्हणजे गेल्यावर्षी जानेवारीत याच परिसरात गव्यांचे दर्शन झाल्यानंतर जवळपास सात महिन्यांपासून त्यांचा वावर सुरुच होता.