प्रियदर्शनी मोरे यांना पदोन्नती: कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कारकीर्द

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे यांची रायगड जिल्हा परिषदेकडे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक म्हणून पदोन्नती मिळाली. पदोन्नतीने रायगड येथे त्यांची बदली झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्या कार्यरत होत्या. प्रियदर्शनी मोरे यांची 2009 मध्ये विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्यावर 2010 पर्यंत त्या विक्रीकर कार्यालय सांगली येथे कार्यरत होत्या. त्यानंतर 2010 मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची निवड झाली. 2010 ते 2014 मध्ये गट विकास अधिकारी, या पदावर पं. स. उस्मानाबाद, तर 2014 ते 2018 गट विकास अधिकारी, पदावर पं. स. पन्हाळा येथे त्या कार्यरत होत्या.

त्यानंतर 2018 ते आज अखेर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता), जि. प. कोल्हापूर पदी त्या कार्यरत होत्या.

प्रियदर्शनी मोरे यांच्या कार्यकिर्दीत जिल्हा परिषदेला मिळालेले सन्मान- सन 2016 – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट काम काम केलेल्या गट विकास अधिकारी म्हणुन केंद्र शासनाच्या वतीने सन्मान, सन 2019 – स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेमध्ये देशपातळीवर जिल्हयाचा दुसरा क्रमांक मिळविण्यामध्ये महत्वपुर्ण योगदान. सन 2020 – जागतिक शौचालय दिनानिमित्त् स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट व सातत्यपुर्ण कामगिरीबद्दल केंद्रशासनाकडून गौरव. जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तीक नळ कनेक्शन देणे व त्यांच्या ऑनलाईन नोंदी पुर्ण करणे, यांचे उद्दिष्ट 100% पुर्ण केलेबद्दल मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते गौरव. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मोरे यांनी आपली कारकीर्द कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पार पडली आहे.

🤙 8080365706