मुश्रीफ, संजय गांधी निराधार पेन्शन वाढीचा जी आर दाखवा, जनतेला खरे सांगा; राजे समरजीतसिंह घाटगे

कागल : मुश्रीफ, संजय गांधी निराधार ची पेन्शन 600 वरून 1000 तुम्ही केलेचे सांगता, तुमच्या काळातील तो जी आर दाखवा. तुम्ही म्हणाल तेथे येऊन आपली माफी मागू. असे परखड मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी फडणवीस सरकारने पेन्शन वाढीचा केलेला जी. आर सभेत दाखवीत व्यक्त केले.

कागल येथे इंदिरा गांधी, संजय गांधी, श्रावणबाळ योजना व राजे बँकेच्या लाभार्थ्यांना पासबुक वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, मुश्रीफ साहेब नागपूरच्या अधिवेशनात प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रोत्सानाची दुसरी यादी केव्हा येणार म्हणून विचारता…? प्रोत्साहन अनुदान मिळवण्यासाठी मागील अडीच वर्ष मंत्री असताना किती वेळा अधिवेशनात आवाज उठवला..? हे जनतेला सांगा उगीचच शेतकऱ्यावरील बेगडी प्रेम दाखवू नका.

शासकीय योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देणे म्हणजे काहींना त्यांच्यावर उपकार केले असे वाटते. आम्ही तसे मानत नाही . कारण हे आपलं कर्तव्यच आहे तो आम्ही राजधर्म मानतो.राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे म्हणाल्या, आमच्या महिला समितीला जिजाऊ चे नाव विचारपूर्वक दिले आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येक आई ही जिजाऊच आहे हीच भावना मला महिलांच्या मध्ये रुजवायची आहे .राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फत महिला सक्षमीकरणासाठी अखंडित कार्य सुरू आहे याचा लाभ व शासनाच्या विविध योजनांचा लाभ माझ्या महिला भगिनींनी घ्यावा .जिजाऊ समितीमार्फत त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करू यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवडीबद्दल राजे समरजितसिंह घाटगे यांचा ज्येष्ठ नागरिकांनी सत्कार केला.दूधगंगा दूध संस्थेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार श्री.घाटगे यांनी केला.यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी,उत्तम पाचगावे,संजय कांबळे,विद्या चव्हाण,गीता वाघमोडे,अविनाश कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी आप्पासो भोसले,राजेंद्र जाधव,लीलाधर घस्ते,यशवंत सोनुले,आनंदा पसारे,पंडीत चव्हाण,संभाजी नाईक आदी उपस्थित होते.स्वागत अरुण गुरव यांनी केले.आभार संदीप नेरले यांनी मानले.छायाचित्र- कागल येथे इंदिरा गांधी,संजय गांधी,श्रावणबाळ योजना व राजे बँकेच्या लाभार्थ्यांना पासबुक वाटप कार्यक्रमावेळी बोलताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व्यासपिठावर सौ.नवोदिता घाटगे,रमेश माळी व इतर

चौकट

कार्यक्रमाची कॉपी

उत्तम पाचगावे म्हणाले, अलीकडे विद्यमान आमदार साहेब राजे साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमाची कॉपी करतात.एका कार्यक्रमाची कॉपी त्यांनी केली नाही हे बरे झाले!राजेसाहेब, तुम्ही कागल मध्ये मोठी मॅरेथॉन स्पर्धा भरवली त्यामध्ये स्वतः धावला…आमचे नशीब आमदार साहेब यांनी या कार्यक्रमाची कॉपी केली नाही नाहीतर त्यांना स्वतः ला धावावे लागले असते. यावर सभेत एकच हास्य पिकला.

🤙 8080365706