मराठमोळ्या कलाविष्कातुन केली संस्कृतीची उधळण ; जयसिंगराव घाटगे हायस्कूल, ज्युनि. कॉलेजचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात…..

” बंजारा ” गीतावर बहारदार नृत्य सादर करताना इयत्ता 8 वी 9 च्या विद्यार्थिनी

कागल : विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती, निस्सीम देशभक्ती,रुढी, परंपरा , नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या, लोकनृत्य इत्यादींचे हुबेहूब अभिनयातून सादरीकरण करत आपल्या कलाविष्कारातून जणू संस्कृतीची उधळण करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकत वहावा मिळविली. निमित्त होते अत्यंत उत्साहात पार पडलेल्या येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या स्नेहसंमेलनांतर्गत आयोजित केलेल्या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे वहिनीसाहेब उपस्थित होत्या .

प्रमुख मान्यवरांचे लेझीम पथकाच्या वाद्यांच्या गजरात व्यासपीठावर आगमन झाले. या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश सुमनाने ‘विघ्नहर्ता’ या गीतावरील नृत्याने झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस.डी. खोत यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये मान्यवरांचा परिचय करून देत सन 2022-23 वर्षाचे अहवाल वाचन केले.बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी शाळेच्या वतीने वर्षभर राबविल्या जाणाऱ्या प्रयोगांबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी बोलताना राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे म्हणाल्या की विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्या पंखांमध्ये बळ निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावरती आशा सांस्कृतिक कार्यक्रमांची नितांत गरज आहे. कोरोनाच्या महामारीत देखील आपल्या शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने ज्ञानार्जनाचे काम करत शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र आदर्श ओळख निर्माण केली आसल्याचे सांगितले.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा कार्यक्रम घेतलेला नव्हता. यंदा या कार्यक्रमाचे शाळेने केलेल्या नेटक्या नियोजनाचे मान्यवरांसह उपस्थितांनीही कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कारखान्याचे संचालक प्रा.सुनील मगदूम, सचिन मगदूम, सौ. रेखाताई पाटील, शिवाजी पाटील, सुजाता तोरस्कर, संजय नरके, कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण , भाऊसो कांबळे, प्रताप पाटील,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन जयश्री पाटील मॅडम यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका जे.व्ही.चव्हाण यांनी मानले .

चौकट…..

विद्यार्थ्यांमधील सेवाभाव जपा विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्यांच्याठायी असणारा सेवा भाव जपणे ही शालेय व्यवस्थापणाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये असणारा हा सेवा भाव वाढण्यासाठी आपल्या शाळेच्या वतीने त्यांच्या समवेत एखाद्या वृध्दाश्रमाला भेट द्यावी, जेणेकरून त्यांना मानवी जीवनातील सेवेचं महत्व समजेल.वर्षातुन एखाद्या तरी वृध्दाश्रमास शाळेने भेट देण्याच्या सुचना व्यवस्थापणास नवोदिता घाटगे यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले.

🤙 8080365706