
मुंबई : मागच्या 4 महिन्यांपासून शिवसेनेत दुफळी पडल्यापासून कार्यकर्त्यांच्या मारहाणीचे प्रकार समोर येत असून बीडमध्ये युवासेना बीडच्या तालुका प्रमुखाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र लिहत व्यथा मांडली आहे. युवासेनेचे स्थानिक विभागीय सचिवाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहोत असा पत्रात उल्लेख केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान आत्महत्या करण्यासा परवाणगी द्यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्यापासून युवासेनेमध्ये अंतर्गत वाद समोर आला आहे. अनेक युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता माजली आहे. दरम्यान अशा आशयाचे पत्र युवासैनिकांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लिहल्याने ठाकरे गटातील अंतर्गत बंडाळी समोर आली आहे.
