
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूज्य मातोश्री हीरा बा यांच्या स्वर्गवासाची बातमी अत्यंत दुःखद आहे.

आई एक अशी व्यक्ती आहे जी जीवनातील पहिली मित्र आणि गुरू असते.हिरा बा यांच्या निधनाने नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
नरेंद्र मोदी यांच्यावर इतकं मोठं दु:ख 33 वर्षानंतर आल्याचे बोलले जात आहे. 1989 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असाच वेदनादायी क्षण वाट्याला आला होता. यामध्ये नरेंद्र मोदी यांचे वडील दामोदरदास मोदी यांचे निधन झाले होते. त्यावेळीही संपूर्ण मोदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे तब्बल 33 वर्षानंतर सर्वाधिक मोठं दु:ख नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला आले आहे.
