
मुंबई : आज भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. अमेरिका, आशियाई बाजारात घसरण झाली. या कमकुवत जागतिक संकेतांमुळे बुधवारी (दि.२८) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पहायला मिळाली.

सेन्सेक्स सुमारे १४० हून अंकांनी घसरून ६०,८०० वर तर निफ्टी १८ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरणीतून सावरत स्थिर पातळीवर आले. त्यानंतर सेन्सेक्स १७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ६०,९१० वर बंद झाला. तर निफ्टी १८,१२२ वर स्थिरावला.अमेरिकेतून मिळालेल्या संकेतांमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक घसरणीसह खुले झाले होते. त्यानंतर ते स्थिर पातळीवर आले. तीन आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचलेल्या तेलाच्या किमती तसेच चीनमध्ये COVID-19 रुग्णसंख्येत झालेली वाढ आदी घटक शेअर बाजारातील व्यवहारांवर परिणाम करणारे ठरले. बहुतेक प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांत घसरण झाली. माहिती तंत्रज्ञान स्टॉक्स सुमारे १ टक्क्याने खाली आले.