
मुंबई : मुंबई महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्याही बापाची नाही आणि त्याच्यावर कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकला ठणकावलं.

कर्नाटकच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे. अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली जाईल असे सांगत मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, या कर्नाटकच्या मंत्र्याच्या वक्तव्याचा निषेधही फडणवीस यांनी विधिमंडळात केला.कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निषेध करत सीमाप्रश्नाला चुकीचे वळण देण्याचे आणि सीमावासीयांच्या भावनेला ठेच पोहचवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे. कर्नाटक सरकारची ही माहीती केंद्र सरकार पर्यंत पोहचवावी, अशी मागणी केली.