विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी केला शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध

नागपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.यावरुन सभागृहात गोंधळ झाला. जयंत पाटलांनी वापरलेला ‘निर्लज्ज” शब्द असंसदीय असल्याने त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.निलंबन प्रकरणावरून विरोधी पक्षाने काल सभात्याग केला. आजही (शुक्रवारी) विरोधकांनी सभागृहात न जाता विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला.

३२ वर्षांचा अनुभव असलेल्या आमदाराला निलंबित करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली.जयंत पाटलांनी वापरलेला तो शब्द कुणाविषयी होता, याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण केलं आहे. अजित पवार सकाळी विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, “जयंत पाटलांनी उच्चारलेला ‘निर्लज्ज’ हा शब्द सभापतींसाठी नव्हता,”विधानसभेतील कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार घालतला आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एकही इंच जागा देणार नाही, असा ठराव करुन मोकळे झाले आहेत. तर महाराष्ट्र सरकार अजूनही गप्प का असा सवाल विरोधी पक्षनेतेअजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जशी त्यांची भूमिका आक्रमकपणे मांडत आहे तशी भूमिका आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का मांडत नाही असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.आज दोन्ही सभागृहातील कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत.विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. सीमाप्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. तीन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. यातच जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करणार आहे. याचे पडसाद विधानभवनात देखील उमटत आहे.

🤙 8080365706