
राष्ट्रीय शेतकरी दिन’ हा दरवर्षी भारतात 23 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस ‘शेतकरी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.राष्ट्रीय शेतकरी दिनाचा इतिहास भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत त्यांनी अत्यंत अल्प कालावधीसाठी पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. अत्यंत साध्या मनाचे ते अत्यंत साधे जीवन जगणारे होते.
