जिल्हास्तरीय मार्शल आर्ट गुरु शिष्य पेंटिंग – प्रदर्शन 25 डिसेंबर रोजी

कोल्हापूर : 1960 च्या दशकात ते आज पर्यंत ब्रुसली या नावाची क्रेझ मार्शल आर्ट नव्हे तर सर्व सामान्य माणसांच्या पर्यंत आजही आहे “विंग – चून सम्राट ईप मॅन” यांचा विद्यार्थी “जगप्रसिद्ध कुंग फू सम्राट ब्रुस ली ” यांच्या व्यक्तीमत्त्वाचे – पेंटिंग प्रदर्शन वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने जिल्ह्यामध्ये प्रथमत: २५ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

या पेटिंग प्रदर्शन मध्ये अनेक छोट्या मुलांनी ते हौशी कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे. या प्रदर्शनात स्केचिंग, वॉटर कलर, पोस्टर कलर फॅब्रिक कलर, चे पेंटिंगने ईप मॅन, ब्रूस ली चे दर्शन घडणार आहे. प्रदर्शन २५ ते २८ डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत दि.वि. फाउंडेशन आर्ट गॅलरी शाहूपुरी कुंभार गल्ली येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत खुले राहील.सर्व ब्रुस ली प्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान संघटनेचे अध्यक्ष राजगौंडा वळिवडे यांनी केले आहे.

🤙 8080365706