
कोल्हापूर : मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या “असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया कॉन्फरन्स” च्या कार्यशाळेत पहिल्याच दिवशी प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर सुरज पवार यांनी ऑपरेशन थिएटर मधील रोबोटिक शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणातून देशभरातील हजारो डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
देशभरातील शल्यचिकित्सकांचा (सर्जन) समावेश असलेल्या असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया कॉन्फरन्स (ॲसिकाॅन) द्वारे कार्यशाळा घेऊन डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येते.यंदा मुंबई विद्यापीठ येथे ८२ वी कार्यशाळा सुरू असून,यामध्ये अनेक नामांकित व अनुभवी सर्जन डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे .या कार्यशाळेमार्फत आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सह कर्नाटक आणि गोवा सीमा भागातील प्रसिद्ध कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर व कॅन्सर तज्ञ डॉक्टर सुरज पवार यांच्याकडून लाईव्ह रोबोटिक ऑपरेशन द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये एका रुग्णाच्या अन्ननलिकेच्या कॅन्सरची रोबोटिक शस्त्रक्रिया करताना,थेट प्रक्षेपणातून डॉक्टर सुरज पवार यांनी देशभरातील सहभागी सात हजारहून अधिक डॉक्टरांना मार्गदर्शन केले.तसेच या जटील शस्त्रक्रियेतील बारकावे आणि घ्यावयाची काळजी याबाबत ही डॉक्टरांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.

अशा थेट प्रक्षेपणातून डॉक्टरांच्या मार्गदर्शनात भर
