पैलवान सानिका पाटीलची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…..

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

शिरोळ: सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील पैलवान सानिका पाटील वय 16 वर्षे हिने 49 वजनी गटात कोल्हापूर विभागीय स्पर्धा मोतीबाग येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.

या स्पर्धा दिनांक 21/ 12/ 2022 रोजी पार पडल्या. सैनिकही एस. के .पाटील कॉलेज कुरुंदवाड येथे शिक्षण घेत आहे.

हिला प्रशिक्षक रमेश कुंभार सर व तिचे वडील अमर पाटील समस्त सैनिक टाकळी ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले .तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

🤙 8080365706