राज्यात यापुढे अनुदानित शाळांना मंजुरी नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात यापुढे कायद्यानुसारसेल्फ फायनान्स म्हणजेच स्वयं अर्थसाहाय्यित शाळांनाच मंजुरी देता येतील, अनुदानित शाळांना नाही असं स्पष्टीकरण विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

यावर.. छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर म्हणाले, तुम्ही म्हणता सेल्फ फायनान्स शाळा काढता येतील, पण मग भीक मागून शाळा काढता येतील का? त्याच्यासाठी निधी गोळा करता येईल का? भीक मागायची पद्धत बरी आहे का? असे प्रश्न विधीमंडळात उपस्थित करत छगन भुजबळ यांनी फडणवीसांनी चिमटा काढला आहे.भीक मागण्याचा शब्द वेगळ्या पद्धतीने, फडणवीसांचे उत्तरभुजबळांच्या प्रश्नाला उत्तर देत फडणवीस म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातही अशा पद्धतीचा उल्लेख आहे आणि भीक मागण्याचा शब्द वेगळ्या पद्धतीने घेण्यात आलेला आहे. पुस्तक वाचलं की हे लक्षात येईल”शाळा हा धंदा नाही” – देवेंद्र फडणवीसराज्यातील 350 वरून थेट 3500 शाळांतील शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेच्या मान्यतेचा प्रस्ताव आला. शाळा हा धंदा नाही असं सांगत फडणवीस यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे.

🤙 8080365706