देशात अन्नधान्याचा मुबलक साठा; केंद्र सरकार

दिल्ली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा व त्या अंतर्गत इतर कल्याणकारी योजनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अतिरिक्त वाटपासाठी केंद्र सरकारकडे अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती केंद्राने दिली आहे.

1 जानेवारी 2023 रोजी सुमारे 159 लाख मेट्रिक टन गहू आणि 104 लाख मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध असतील, जे 1 जानेवारी 2013 पर्यंत 138 लाख मेट्रिक टन गहू आणि 76 लाख मेट्रिक टन तांदूळ यासंबंधित निश्चित मानदंडांपेक्षा खूप जास्त आहेत. मध्यवर्ती साठ्यात 15 डिसेंबरपर्यंत 180 लाख मेट्रिक टन गहू आणि 111 लाख मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध होते.भू-राजकीय परिस्थितीमुळे खुल्या बाजारात किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त किमतीत शेतकर्‍यांनी गहू विकल्यामुळे तसेच कमी उत्पादन झाल्यामुळे मागील हंगामानात गव्हाची खरेदी कमी होती, तरीही पुढील हंगामात गव्हाचे पीक येईपर्यंत देशाच्या गरजेनुसार गव्हाचा पुरेसा साठा मध्यवर्ती food storage साठ्यात उपलब्ध असेल. कल्याणएकारी योजनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मध्यवर्ती साठ्यात पुरेसा गव्हाचा साठा असल्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत तांदूळ वाटपातही सुधारणा करण्यात आली आहे.

🤙 8080365706