
कोल्हापूर : हर हर महादेव चित्रपटावरून देखील महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला होता. आता या चित्रपटावर अभिनेता सुबोध भावेने त्याची प्रतिक्रिया दिली असून सुबोध भावे यांनी यापुढे बायोपिकमध्ये काम करणार नसल्याचे म्हटले आहे.

१८ डिसेंबर, २०२२ म्हणजे आजच्या दिवशी झी मराठी वाहिनीवर हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट वाहिनीवर प्रदर्शित केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला होता.अभिनेता सुबोध भावे सध्या कोल्हापुरात शूटिंग करत आहेत. कोल्हापुरातील शिवभक्तांनी आक्षेपार्ह सीन वगळता चित्रपट दाखवला नाही तर पुढचे काही दिवस सुबोध भावे कोल्हापुरात शूटिंग करत आहेत, असा इशारा दिला आहे. ‘मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करेन, परंतु इथून पुढे कोणताही बायोपिक करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक सिनेमा असेल, असे सुबोध भावे यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील शिवभक्तांनी सुबोध भावेची भेट घेऊन त्यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह सीन वगळण्यास शिवभक्तांच्या भावना दिग्दर्शक आणि निर्मात्यांपर्यंत पोहचविण्याची विनंती केली. संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्यांनी या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाला देखील विरोध केला होता. या चित्रपटामधील कलाकार भूमिकेला साजेसे नाही असे त्यांनी म्हटले. ऐतिहासिक चित्रपटावरून होणाऱ्या वादामुळे अभिनेता सुबोध भावे याने बॉयोपिकमध्ये काम न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
