हिवाळी अधिवेशन: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने-सामने

मुंबई: राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत असून या अधिवेशनाला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यात झालेलं सत्तांतर त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने येणार आहेत.

त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय संवाद होतो? उद्धव ठाकरे शिंदे सरकारला अधिवेशनात कसे फैलावर घेतात आणि अधिवेशनात कोणते मुद्दे मांडून शिंदे-फडणवीससरकारला अडचणीत आणतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.उद्या सोमवार 19 डिसेंबरपासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन होत आहे. कोरोना संकटानंतरचं नागपूरमध्ये होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे नागपूर नगरी अधिवेशनासाठी सज्ज झाली आहे. नागपुरात जागोजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत.त्याशिवाय राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं नागपुरात होणारं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचंही हे पहिलंच अधिवेशन असणार आहे.

🤙 8080365706