कोटक मुलींची शिष्यवृत्ती सुरू…..

मुंबई : कोटक एज्युकेशन फाउंडेशनने विशेषतः मुलींच्या शैक्षणिक पात्रतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोटक मुलींची शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

कोटक एज्युकेशन फाऊंडेशनने कोटक मुलींची शिष्यवृत्ती सुरू केली आहे.आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडणाऱ्या अशा विद्यार्थिनींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. त्या विद्यार्थिनींना कोटक एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे ₹ 100000 ची शिष्यवृत्ती रक्कम दिली जाईल.कोटक बँक कन्या शिष्यवृत्ती योजना -नामांकित संस्थांमधून मान्यताप्राप्त प्रथम वर्षाचे पदवी कार्यक्रमात प्रवेश मिळालेली गुणवंत विद्यार्थिनी या ठिकाणी पात्र आहेत. तसेच इतर बारावी बोर्डाच्या परीक्षेत अर्जदारांनी 85% किंवा त्याहून अधिक गुण किंवा समतुल्य मिळवलेले असावे.

अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये तीन लाख वीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. कोटक महिंद्रा ग्रुप, एज्युकेशन फाउंडेशन आणि बडी फोर स्टडी च्या कर्मचाऱ्यांची मुले कोटक कन्या शिष्यवृत्ती 2022 साठी अर्ज करण्यासाठी पात्र नाहीत.

🤙 8080365706