
प्रयाग चिखली : वरणगे ता.करवीर येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रचाराला वेग आला आहे.करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री भैरवनाथ ग्रामविकास पँनेलने प्रचारात आघाडी घेतली आहे. या पँनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे असे सरपंच पदाचे उमेदवार लक्ष्मण कनोजे यांनी सांगितले.

माजी सरपंच अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांनी सुरवाती पासून प्रचारात आघाडी घेतली आहे.अमित पाटील यांनी शासकीय निधी खेचून आणून गावचा सर्वागीण विकास केला आहे.त्यामुळे मतदारातून या पँनेललाच पसंती मिळत आहे.
सरपंच पदासाठी लक्ष्मण कनोजे तर राहूल पाटील, आयाज मूल्लाणी,सरस्वती पाटील, आजय पांढरे, रूपाली कनोजे, अमीत पाटील, उल्का बुचडे, जयश्री व्हरांबळे, युवराज व्हरांबळे, प्रभावती गायकवाड, सरस्वती पाटील हे या पँनेलने उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदारांचा भरघोस पाठिंबा पहाता.सर्व उमेदवार निवडून येणार .गुलाल आमचाच आहे असे लक्षण कनोजे यांनी सांगितले.
