श्रद्धा हत्याकांडच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : देशभरात गाजत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाची दखल घेत शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

वसई येथील श्रद्धा वालकरची दिल्लीत निघृण हत्या करण्यात आली. श्रद्धा ही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आफताबसोबत राहत होती. आफताबने श्रद्धाची हत्या करुन तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली अथवा महिलांना सहाय्य करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे गठन करण्यात आले आहे.नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत विवाह, धार्मिक स्थळी करण्यात आलेले विवाह, पळून जाऊन केलेले विवाह अशा प्रकारे आंतरधर्मीय विवाह केलेल्या व्यक्तींची माहिती प्राप्त करणे. नवविवाहीत मुली अथवा महिला तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन सद्य:स्थितीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत किंवा कसे? याबाबत माहिती घेणे. स्वतःच्या कुटुंबियांच्या संपर्कात नसलेल्या मुली अथवा महिला यांची त्यांच्या आई- वडिलांच्या सहाय्याने माहिती घेणे. आई वडिल इच्छुक नसल्यास तज्ज्ञ समुपदेशकाद्वारे त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांच्यामधील वाद-विवादाचे निराकरण करणे करीता व्यासपीठ उपलब्ध करुन याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरीता महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय तसेच अशासकीय सदस्यांची “आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती गठित केली आहे.

🤙 8080365706