UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

मुंबई : मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट वाढले असून तुम्ही जर UPI पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

गुगल पे , फोनपे, अॅमेझॉन पे आणि पेटीएम अशा सर्वच कंपन्यांनी पेमेंटवर लिमिट लावलं आहे.त्यामुळे आता तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यात अडचणी येऊ शकतात. पैसे ट्रान्सफर करताना तुम्हाला हे लिमिट माहिती नसेल तर नुकसान होऊ शकतं.प्रत्येक दिवशी किती पाठवता येणार पैसे?नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार आता यूपीआयमधून तुम्ही दररोज 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. त्याचबरोबर काही छोट्या बँकांनी ही मर्यादा 25 हजारांपर्यंत निश्चित केली आहे. प्रत्येक अॅपनुसार हा नियम बदलतो त्यामुळे कोणत्या अॅपसाठी किती मर्यादा लावण्यात आल्या आहेत पाहा.पेमेंटवर लिमिट लावल्याने त्याचा परिणाम देशातील कोट्यवधी यूपीआय युजर्सना होणार आहे. एनपीसीआयकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करून माहिती देण्यात आली आहे.

🤙 8080365706