
गगनबावडा : दिगंबर म्हाळुंगेकर
चौधरवाडी ता. गगनबावडा येथील शेतकरी शिवाजी श्रीपती शेलार (वय ४०) हे गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संध्याकाळी पाचच्या सुमारास सुतारांचा मळा नावाच्या शेतात ऊसतोड करत होते. त्यामुळे उसामध्ये असलेल्या गव्याच्या हालचालीचा अंदाज आला नाही. पाठीमागून जोराची धडक मारल्यामुळे ते बांधाच्या खाली पडले. प्रसंगावधान राखून स्वतःला सावरले व गव्याच्या धडकेतून सुटका करून घेतली. शेतकरी सकाळी वैरण आणण्यासाठी शेतामध्ये गेले असता उसात बसलेले गवे हल्ला करतात असे अनेक प्रकार धामणी खोरीत या अगोदर देखील घडले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
