शहर व्यापारी संघटनेचा म्हाप्रळ आंबेत पुलावरुन पाण्याता उड्या मारुन जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा

म्हाप्रळ -आंबेत पुल गेल्या तीन वर्षांपासून नादुरस्थ असल्याने ठप्प असलेल्या वाहतूकीचे प्रश्नावर शहर व्यापारी संघटनेने पुकारलेले आंदोलन अंतीम टप्यात पोहचले आहे.रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी शहर व्यापारी संघटनेने म्हाप्रळ आंबेत पुलावरुन पाण्याता उड्या मारुन जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा प्रशासनास दिला आहे.

दरम्यान या विषया संदर्भात 8 डीसेंबर 2022 रोजी तहसिलदार विजय सुर्यवंशी यांच्यासमवेत मंडणगड तहसिल कार्यालयात झालेली शहर व्यापारी संघटनेची सभा निष्फळ ठरल्याची माहीती शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर यांनी दिली आहे. चर्चेदरम्यान शहर व्यापारी संघटनेने शासनाने वर्क ऑर्डर केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची व गरज भासल्यास जलसमाधी घेण्याचे आंदोलन करणार असल्याचे भुमीकेचा पुन्नर्रोचार केला यावेळी तहसिलदार विजय सुर्यवंशी यांनी प्रशासकीय पातळीवर शहर व्यापार संघटनेच्या मागणीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या पाठ पुराव्याची विस्ताराने माहीती देत आंदोलन न करण्याचे आवाहन केले.

🤙 8080365706