१३ जानेवारीपासून कोल्हापूर बंगळूर विमान सेवा प्रारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर- बंगळूर मार्गावर विमानसेवा 13 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनी  या मार्गावर सेवा देणार आहे.

आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे बंगळूरमधून हे विमान पुढे कोईमतूरला जाईल. त्यामुळे दक्षिणेकडे राज्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक शिक्षण आणि नोकरी निमित्त जाणाऱ्यांसाठी चांगला पर्याय मिळाला आहे. इंडिगो कंपनीकडून सध्या कोल्हापुरातून तिरुपती अहमदाबाद आणि हैदराबाद या मार्गावर विमानसेवा पुरविण्यात येत आहे.या कंपनीने आता बंगळूर मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मार्गावरील विमानसेवा बंद आहे. कोल्हापूर बंगळूर विमानसेवा पूर्ववत करण्यात येईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले होते. दरम्यान, बंगळूर आयटी तर फाउंड्री आणि उद्योगांसाठी कोईमतूर प्रसिद्ध असल्याने कोल्हापुरातील उद्योजक नोकरदार विद्यार्थ्यांची वाहतुकीची चांगली सोय होणार आहे, अशी माहिती विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी दिली.

🤙 8080365706