
मानवी शरीर प्रोटीन साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे शरीराला वारंवार प्रोटीनचा पुरवठा करण्याची गरज असते. या टिप्स लक्षात ठेवून आहार घेतला तर आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोषण होण्यास निश्चितच मदत होईल. यासाठी त्या काय सांगतात पाहूया…
पनीर
आपण साधारणपणे पोळी आणि भात हे मुख्य जेवण घेतो. यातही आपण रोज पोळ्या, फुलके असे काही ना काही करतोच. त्यावेळी पोळीच्या कणकेत पनीर घालून त्याचा पराठा करा, म्हणजे नकळत प्रोटीन तुमच्या शरीरात जाईल. याशिवाय पनीरचा भातही आपण नक्कीच करु शकतो. पनीर हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असल्याने त्याचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे.
कडधान्य
कडधान्य हाही प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे ब्रेकफास्टला कडधान्याची उसळ, जेवणात सलाडमध्ये कडधान्य यांचा आवर्जून समावेश करायला हवा. याशिवाय कडधान्याचा भातही चांगला होतो. धिरडे, डोसा यांमध्येही आपण कडधान्याचा वापर करुन शकतो.
