
मुंबई : मुंबईतील एका तरुणाने सोलापूरातील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केलं होतं. त्यामुळे या विवाहाची राज्यभर एकच चर्चा रंगली. अनेकांनी या तरुणांची खिल्ली उडवली. तर, काहींनी यावर नाराजी दर्शवली. दरम्यान, या लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणाच्या आनंदावर विरजन पडलं. कारण, महिला आयोगाने याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. आता पोलिस चौकशीत या तरुणाचे असे काही कारनामे समोर आले आहेत, जे ऐकूण अनेकांना ४४० व्होल्टचा झटका बसलाय. दोन जुळ्या बहिणींसोबत संसार थाटणारा नवरदेव अतुल अवताडे याचे आधीच एक लग्न झाले असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

अतुलचं याआधी सुद्धा लग्न झालेलं आहे. त्याच्या पहिल्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे याबाबतची तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अतुल अवताडे हा चांगलाच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. अतुल याच्यासोबत सोलापूरातील दोन्ही जुळ्या बहिणांवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिस अतुलची कसून चौकशी करत आहेत.जुळ्या बहिणींशी लग्न करणारा अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील मूळ रहिवासी आहे. त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणाऱ्या दोन तरुणी पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणी आहेत.दोघीही आयटी इंजिनिअर आहेत. पिंकी आणि रिंकीला एकमेकींबद्दल अतिशय ओढा असून आजवर त्या दोघी एकाच ताटात जेवतात असे काही जणांनी सांगितले. बालपणापासून एकत्र राहत असलेल्या पिंकी आणि रिंकीला शेवटपर्यंत सोबतच राहायचं आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.कायम एकत्र राहण्यासाठी त्यांना एकच नवरा हवा होता. अखेर अवताडे आणि पाडगावकर कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली. अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे २ डिसेंबर 2022 रोजी हा विवाह संपन्न झाला.रिंकी आणि पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणी आपल्या वडिलांच्या पश्चात विधवा आईसह एकत्र राहायच्या. एकेदिवशी आईसह दोन्ही जुळ्या बहिणी आजारी पडल्या. त्यांना अतुल याने रूग्णालयात दाखल केले होते. टॕक्सी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या अतुल याने दोन्ही रिंकी आणि पिंकीसह त्यांच्या आईला आजारपणात केलेली मदत मोलाची होती. घरात पुरूष नसल्यामुळे अतुल आधार बनला होता. दरम्यान, दोन्ही जुळ्या बहिणींपैकी एकीचा अतुलवर जीव जडला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, आता पोलिस तपासात अतुलचं याआधी सुद्धा लग्न झालेलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या पहिल्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे याबाबतची तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अतुल अवताडे हा चांगलाच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. अतुल याच्यासोबत सोलापूरातील दोन्ही जुळ्या बहिणांवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
