
मुंबई : कॉंग्रेस खासदार शशी थरुर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच चर्चेवर शशी थरुर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थरूर यांना एक खुली ऑफर दिली आहे. ‘शशी थरूर यांची राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांचे आनंदाने स्वागत करू. काँग्रेस पक्षाने नाकारल्यानंतरही त्यांची तिरुअनंतपुरूम येथून खासदारकी कायम राहील. काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्ष का करत आहे, हे मला समजत नाहीये,’ असे चाको यांच्या या विधानानंतर थरुर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला राष्ट्रवादीत जायचे असल्यास स्वागताची गरज भासेल. मात्र मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाही. पक्षप्रवेशाबाबत पीसी चाको यांच्याशी कोणताही चर्चा झालेली नाही. अशा शब्दात प्रवेशावर स्पष्टीकरण दिलं.काँग्रेस पक्षातीलच थरूर यांच्या विरोधकांच्या मते केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी थरूर मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रतिमासंवर्धनाचे काम सुरू केले आहे. २०२६ साली येथे विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. तर मला घाबरण्याचे कारण नाही. मला केरळ काँग्रेसमध्ये कोणतेही गट पाडायचे नाहीत. माझी तशी इच्छा नाही, असही थरुर यावेळी म्हणाले.केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पीसी चाको म्हणाले.
