भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूरला राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये दुहेरी यश

कोल्हापूर : भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूरने इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य रामचंद्र पॉलीटेक्निक पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऍथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमधील भालाफेक क्रीडा प्रकारात उत्तुंग संपादन केले.

सदर स्पर्धेमध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात महाविद्यालयातील खेळाडू कुमार आयुष विनोद पाटील द्वितीय वर्ष संगणक विभाग 45.90 मीटर भालाफेक करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उत्तुंग यश संपादन केले तसेच लट्टे पॉलीटेक्निक सांगली येथे मुलींच्या पार पडलेलया अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमधील उंच उडी या प्रकारामध्ये कुमार हिना मुजावर प्रथम वर्ष संगणक विभाग हिने उपविजेतेपद पटकावले सदर विजेत्या खेळाडूंना क्रीडा संचालक श्री लालासाहेब चव्हाण यांची मार्गदर्शन लाभले हे संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची डॉक्टर एच एम कदम मानद संचालक भारती विद्यापीठ पुणे विभागीय कार्यालय सांगली महाविघालयाचे प्राचार्य श्री एम एस देशमुख तसेच शिक्षक शिक्षक सेवक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले

🤙 8080365706