
रत्नागिरी: हल्ली लोक सगळेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. असाच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रत्नागिरीतला असून त्यात एक रिक्षा गोल-गोल फिरताना दिसत आहे.
या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. हा व्हायरल व्हिडिओ रत्नागिरीतील जेल नाका या परिसरातला आहे. हे दृश्य पाहिल्यावर तुम्ही देखील चक्रावाल. रत्नागिरी जेल नाकाजवळ एक रिक्षा चालकाविना गोल गोल फिरताना दिसत आहे. हा रिक्षा गोल गोल फिरताना पाहिल्यावर तिथे लोकांची गर्दी झाली. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न हा रिक्षा चालकाविना गोल कसा फिरु शकतो? रत्नागिरी जेल नाका येथे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक रिक्षाचा अपघात झाला. अपघातादरम्यान रिक्षा चालक ही बाहेर फेकला गेला.
मात्र त्यादरम्यान रिक्षाचे हॅंडल लॉक झाले आणि रिक्षा जागच्या जागी गोल फिरू लागला. तेथील स्थानिकांनी रिक्षा थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण रिक्षा काही केल्या थांबेना. अखेर रिक्षा अडवून धरण्यात आली. आणि मग रिक्षाचे हॅंडल अनलॉक करण्यात आले. या अपघातामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.हा व्हिडिओ लोकांचे मनोरंजन तर करतच आहे सोबतच लोकांना तो व्हिडिओ पाहताना कुतूहल देखील वाटत आहे. अचानक गोल फिरणारा रिक्षा लोकांनी पहिल्यांदाच पाहिला असेल. म्हणूनच हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.